
तळेरे, दि. २३ :
देवगड तालुक्यातील गवाणे गावचे सुपुत्र आणि मुंबईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक तावजी सहदेव गोरुले यांचे बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास विक्रोळी येथील निवासस्थानी दु:खद निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गवाणे गावाकडून असंख्य ग्रामस्थ मुंबईला रवाना झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.



