कासार्डे येथील विरेंद्र सुतार यांचे आकस्मिक निधन

0
18

तळेरे, दि. २३

कासार्डे उ. गावठण येथील ग्रामस्थ तथा कासार्डे सिनिअर कॉलेजचे लिपिक विरेंद्र जनार्दन सुतार (वय ४७) यांचे गुरुवारी दुपारी १२.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कासार्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरेंद्र सुतार हे कासार्डे सिनिअर कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विद्यालयातील सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील, दोन लहान मुलगे, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here