
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांचे न्याय्य हक्क, सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक बळकटीकरणाचा एल्गार पुकारत भारतीय मजदूर संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी कणकवली येथील मराठा मंडळ हॉलमध्ये अत्यंत उत्साही व दणदणीत वातावरणात पार पडले. या अधिवेशनात सर्वसम्मतीने नवीन १५ सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, कामगारांच्या हिताचे पाच महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले.
सकाळी दहा वाजता जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून, प्रेरणादायी ‘श्रमिक गीत’ सादरीकरण आणि प्रतिमापूजनाने या अधिवेशनाचा दिमाखदार शुभारंभ झाला. जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करून अधिवेशनाची पार्श्वभूमी विशद केली. या अधिवेशनाला भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरणजी मिलगीर, प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, प्रदेश सचिव हरी चव्हाण आणि विभाग संघटक भगवान साटम यांच्यासह विविध संलग्न संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी संघटनात्मक कार्यअहवाल तर कोषाध्यक्ष ओमकार गुरव यांनी आर्थिक अहवाल सादर केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, संघटनात्मक बांधणी आणि भारतीय मजदूर संघाच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रदेश महामंत्री किरणजी मिलगीर यांनी, कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी तळागाळात संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवणे आणि एकजूट टिकवणे ही आजची गरज असल्याचे अधोरेखित केले.
अधिवेशनाच्या उत्तरार्धात भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन १५ सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये सौ. वंदना विलास तावडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून श्री. हेमंतकुमार परब यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी श्री. अशोक अंकुश घाडीगावकर, श्री. सत्यविजय राजाराम जाधव, सौ. सीमा संतोष धुरी; सहसचिवपदी श्रीमती शुभांगी जयराम सावंत, सौ. प्राची प्रविण परब, श्री. सचिन सुभाष लवेकर; कोषाध्यक्षपदी श्री. ओमकार दिपक गुरव; तर संघटकपदी श्री. दत्ताराम सदाशिव घाडीगावकर यांची निवड झाली आहे. याशिवाय सौ. संचिता सुनील ठाकूर, श्री. महेंद्र मंगेश मर्गज, श्री. संतोष केशव नाचणेकर, श्री. गुरुनाथ श्रीकांत मेस्त्री आणि श्री. अशोक विठोबा जगताप हे नवीन कार्यकारिणीत सदस्य म्हणून समाविष्ट झाले आहेत. नूतन अध्यक्षा सौ. वंदना तावडे यांनी आपल्या मनोगतात नवीन टीमच्या माध्यमातून कामगार हिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.
अधिवेशनाच्या शेवटी कामगारांच्या हक्कासाठी शासनाचे लक्ष वेधणारे पाच महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले, ज्यांना सर्वसहमती मिळाली. यामध्ये असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना हक्काची सामाजिक सुरक्षा लागू करणे, कामगार कायद्यांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करणे, महाराष्ट्रातील विविध कामगार कायद्यांतर्गत येणारी मंडळे व समित्यांचे त्वरित पुनर्गठन करणे, घरेलू कामगार कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे आणि बांधकाम कामगारांचे रद्द करण्यात आलेले लाभ तातडीने पूर्ववत सुरू करणे, या मागण्यांचा समावेश होता.
राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व कामगारांसाठी भोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. या यशस्वी आणि व्यापक अधिवेशनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांच्या लढ्याला एक नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे. सामाजिक सुरक्षा आणि संघटनात्मक बळकटीकरणाचा एल्गार पुकारत भारतीय मजदूर संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी कणकवली येथील मराठा मंडळ हॉलमध्ये अत्यंत उत्साही व दणदणीत वातावरणात पार पडले. या अधिवेशनात सर्वसम्मतीने नवीन १५ सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, कामगारांच्या हिताचे पाच महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आले.
सकाळी दहा वाजता जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून, प्रेरणादायी ‘श्रमिक गीत’ सादरीकरण आणि प्रतिमापूजनाने या अधिवेशनाचा दिमाखदार शुभारंभ झाला. जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करून अधिवेशनाची पार्श्वभूमी विशद केली. या अधिवेशनाला भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरणजी मिलगीर, प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, प्रदेश सचिव हरी चव्हाण आणि विभाग संघटक भगवान साटम यांच्यासह विविध संलग्न संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी संघटनात्मक कार्यअहवाल तर कोषाध्यक्ष ओमकार गुरव यांनी आर्थिक अहवाल सादर केला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, संघटनात्मक बांधणी आणि भारतीय मजदूर संघाच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रदेश महामंत्री किरणजी मिलगीर यांनी, कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी तळागाळात संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवणे आणि एकजूट टिकवणे ही आजची गरज असल्याचे अधोरेखित केले.
अधिवेशनाच्या उत्तरार्धात भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नवीन १५ सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये सौ. वंदना विलास तावडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून श्री. हेमंतकुमार परब यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी श्री. अशोक अंकुश घाडीगावकर, श्री. सत्यविजय राजाराम जाधव, सौ. सीमा संतोष धुरी; सहसचिवपदी श्रीमती शुभांगी जयराम सावंत, सौ. प्राची प्रविण परब, श्री. सचिन सुभाष लवेकर; कोषाध्यक्षपदी श्री. ओमकार दिपक गुरव; तर संघटकपदी श्री. दत्ताराम सदाशिव घाडीगावकर यांची निवड झाली आहे. याशिवाय सौ. संचिता सुनील ठाकूर, श्री. महेंद्र मंगेश मर्गज, श्री. संतोष केशव नाचणेकर, श्री. गुरुनाथ श्रीकांत मेस्त्री आणि श्री. अशोक विठोबा जगताप हे नवीन कार्यकारिणीत सदस्य म्हणून समाविष्ट झाले आहेत. नूतन अध्यक्षा सौ. वंदना तावडे यांनी आपल्या मनोगतात नवीन टीमच्या माध्यमातून कामगार हिताचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.
अधिवेशनाच्या शेवटी कामगारांच्या हक्कासाठी शासनाचे लक्ष वेधणारे पाच महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले, ज्यांना सर्वसहमती मिळाली. यामध्ये असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना हक्काची सामाजिक सुरक्षा लागू करणे, कामगार कायद्यांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करणे, महाराष्ट्रातील विविध कामगार कायद्यांतर्गत येणारी मंडळे व समित्यांचे त्वरित पुनर्गठन करणे, घरेलू कामगार कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे आणि बांधकाम कामगारांचे रद्द करण्यात आलेले लाभ तातडीने पूर्ववत सुरू करणे, या मागण्यांचा समावेश होता.
राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर उपस्थित सर्व कामगारांसाठी भोजनाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. या यशस्वी आणि व्यापक अधिवेशनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांच्या लढ्याला एक नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे.x154.jpeg” alt=”” width=”300″ height=”154″ class=”alignnone size-medium wp-image-1081″ />




