कामगार प्रश्नांना मिळणार नवा आणि आक्रमक आवाज! भारतीय मजदूर संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी संतोष नाचणेकर यांची निवड

0
0

भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी कणकवली येथे पार पडले. या महत्त्वपूर्ण अधिवेशनात संघटनेचे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि निष्ठेचे कार्यकर्ते म्हणून संतोष केशव नाचणेकर यांची भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी सर्वसम्मतीने निवड करण्यात आली आहे.
या धडाडीच्या कार्यकर्त्यांवर कणकवली, वैभववाडी आणि देवगड या उपविभागांमधील कामगारांच्या विविध अडीअडचणी, ज्वलंत प्रश्न आणि मागण्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तळागाळातील कामगारांचे प्रश्न प्रत्यक्ष समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे नवे नेतृत्व अधिक सक्रियपणे काम करेल, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संघटनात्मक कार्यात नेहमीच पुढे राहणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कामगार चळवळीला आणखी नवी ऊर्जा मिळणार असून, त्यांच्या या गौरवास्पद यशा बद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here