आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

0
6

आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त ८ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी, दि. २८ नोव्हेंबर 

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. ८ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवी आणि इयत्ता आठवी ते बारावी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये ३,०००/-, २,०००/- व १,०००/- रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच चौथ्या ते सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूंना उत्तेजनार्थ पदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रुपये ५०/- असून दि. ६ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांची एकाग्रता, तर्कशक्ती व निर्णयक्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रा. एस. बी. पाटील (९५०३८०९१९२) आणि डॉ. के. पी. पाटील (७५८८५७६९७०) यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here