शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामुळे गती; अनेक मान्यता आदेशांचे वितरण  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष बैठक; आमदारांच्या हस्ते संबंधितांना आदेश प्रदान

0
0

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यामुळे गती; अनेक मान्यता आदेशांचे वितरण

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष बैठक; आमदारांच्या हस्ते संबंधितांना आदेश प्रदान 

सिंधुदुर्ग, दि. २७ नोव्हेंबर :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या दालनात कोकण शिक्षक आमदार तथा शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक शिक्षक आपापले प्रलंबित प्रस्ताव व समस्या घेऊन बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, वैद्यकीय बिल मंजुरी, शालार्थ प्रणालीतील नोंदणी तसेच इतर प्रलंबित वैयक्तिक मान्यतांच्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात आली.

यामध्ये श्रीमती कविता प्रकाश नलावडे (सरस्वती हायस्कूल, नांदगाव) यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता, श्री. दीप्ती गणेश गोसावी यांना अनुकंपा तत्त्वावरील शिपाई पदाच्या नियुक्तीस मान्यता, श्री. रमेश चंद्रकांत हळदणकर (कलेश्वर विद्यामंदिर, नेरूर) यांना अनुकंपा नियुक्ती मान्यता, श्रीमती सुषमा सुनील वायंगणकर (शिवाजी मेमोरियल हायस्कूल) यांना निवडश्रेणी मान्यता, श्री. विजय रामचंद्र घोरपडे (एस. हायस्कूल, कणकवली) यांना वैद्यकीय बिल मंजुरीचा आदेश अशा विविध प्रकरणांमध्ये मंजुरी देण्यात आली.

विशेष म्हणजे, मंजूर झालेल्या विविध मान्यता व आदेशांचे वितरण कोकण शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्ग मिळून संबंधितांना मोठा दिलासा मिळाला.

शिक्षकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यवाही होण्यासाठी आमदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला. या बैठकीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळाली.

यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बांधव आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणारे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच सहकार्य करणाऱ्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपस्थित शिक्षकांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here