बाबुराव बागुल कथा आणि नामदेव ढसाळ काव्य पुरस्कारासाठी आवाहन
सम्यक संबोधी संस्था सिंधुदुर्गतर्फे कथा – काव्य स्पर्धेचे आयोज
कणकवली, दि. १५
सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे बाबुराव बागुल कथा पुरस्कार आणि नामदेव ढसाळ कविता पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या दोन्ही स्पर्धेसाठी कथाकारांनी आपली एक उत्तम कथा आणि कवीनी आपल्या पाच उत्तम कविता पाठविणे बंधनकारक आहे. आपलं लेखन सदर स्पर्धेसाठी 5 नोव्हेंबर 2026 पर्यंत पाठवावे असे आवाहन सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष कवी किशोर कदम यांनी केले आहे.
सम्यक संबोधी साहित्य संस्था गेली काही वर्ष परिवर्तन विचार डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रम आयोजित करत असते. यात बाबुराव बागुल कथा स्पर्धा आणि नामदेव ढसाळ काव्य स्पर्धा हा महत्त्वाचा उपक्रम असतो. कथा केवढीही मोठी चालू शकते. फक्त ती प्रसिद्ध झालेली नसावी. कवींनी पाच कविता पाठवाव्यात. मात्र त्या कवितासंग्रहात प्रसिद्ध झालेल्या नसाव्यात. कथा काव्यसाठी विषयाचे बंधन नाही. मात्र कथा कविता लेखन मेल केले जाऊ नये. कुरियर किंवा पोस्टाने पाठविणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. जे लेखन स्पर्धेसाठी पाठविले जाईल ते इतर स्पर्धकांना माहितीसाठी सोशल मीडियावर टाकण्याची परवानगी असेल त्याच साहित्यिकाने स्पर्धेत सहभागी व्हावे.
स्पर्धेसाठी कथा आणि कविता पाठविण्याचा पत्ता- किशोर देऊ कदम
फ्लोरेट कॉलेज कणकवली, कणकवली कॉलेज रोड
नवीन पोस्ट ऑफिसच्या वरती,
कणकवली-सिंधुदुर्ग
पिन.नंबर 416602
मोबाईल नंबर 9422963655



