शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अव्वल: ६ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
24

शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अव्वल:
६ खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवडतळेरे, दि. १६

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा क्रीडा संकुल ओरोस येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे प्रशालेच्या ६ खेळाडूंनी अभिनंदन अभिनंदनीय यश संपादन केले आहे. या ६ ही यशस्वीऊ खेळाडूंचे कोल्हापुरी विभागीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड झाली आहे
*यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे-*
*१४ वर्षाखालील मुले*
कु.अथर्व गुरुप्रसाद सावंत – 8 वी ब – प्रथम क्रमांक
कु. सार्थक राजकुमार वायंगणकर- 8 वी ब – तृतीय क्रमांक
*१७ वर्षाखालील मुले*
कु. पार्थ लक्ष्मीकांत कल्याणकर- 11 वी संयुक्त – तृतीय क्रमांक
कु. उत्कर्ष जयप्रकाश परब 10 वी ब चतुर्थ क्रमांक
*१९ वर्षाखालील मुले*
कु. नयन सुनिल रावराणे -11 वी विज्ञान-तृतीय क्रमांक
कु. यशराज ओमप्रकाश नारकर – 9 वी ब चतुर्थ क्रमांक्र

या गुणवंत खेळाडूंना प्रशालेचे प्रा. रामचंद्र राऊळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले असून यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी प्रशालेच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे ,प्र.मुख्याध्यापक ए.पी.घुले, जेष्ठ शिक्षिका आर.आर.सरवणकर, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड आदीनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्क्वॅश स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो – :
शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या सोबत ,प्राचार्या, पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक मार्गदर्शक शिक्षक व इतर शिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here