शिरोड्यात २३ ऑक्टोबर रोजी थाटात होणार गोंधळोत्सव जत्रा; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0
28

 

शिरोड्यात २३ ऑक्टोबर रोजी थाटात होणार गोंधळोत्सव जत्रा; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शिरोडा, दि. २०:
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोडा येथील शेत्येडोंगरी येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही ‘गोंधळोत्सव जत्रा’ मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ (अश्विन शुद्ध द्वादशी १९४८) रोजी हा सोहळा संपन्न होत असून, यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य आकर्षण व धार्मिक कार्यक्रम:
उत्सवाच्या दिवशी सकाळी ९.०० वाजता श्री देवी महालक्ष्मी परिवार देवतांची पूजा आणि अभिषेक केला जाईल. त्यानंतर दुपारी १.०० वाजता नैवेद्य व समाराधना होईल, आणि दुपारी १.३० वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण सुरू होईल.
संध्याकाळी ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, शिरोडा यांच्या वतीने हरिपाठ होणार असून, रात्री ८.३० वाजता भजनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर रात्री १०.०० वाजता श्री देवीच्या निशाणासह मिरवणूक व आरती होईल आणि रात्री १०.४५ वाजता देवींच्या अवसार देवतांच्या साक्षीने सालाबादप्रमाणे पारंपरिक गोंधलोत्सव सोहळा संपन्न होईल.


मनोरंजनात्मक कार्यक्रम:
भाविकांच्या मनोरंजनासाठी रात्री विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दांडिया आणि गरबा तसेच रात्री १.०० वाजता ‘मामा मोचेमाडकर दशावतार मंडळ’चा नाटक प्रयोग सादर केला जाणार आहे.
उत्सवाचा सोहळा अधिक आनंददायी करण्यासाठी श्री देवी महालक्ष्मी देवस्थान आणि शेट्ये परिवार, शेट्येदोंगरी (शिरोडा) यांच्या वतीने सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here