जलसंधारणाच्या लोकचळवळीला मिळणार अनुभवांचे शब्दरूप; ‘जलनीती’ उपक्रमात अनुभवकथन, गद्य-पद्य, कविता, चारोळी, छायाचित्रे व व्हिडिओ पाठविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

0
1

सिंधुदुर्ग, दि. २२

पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे श्रमदान, जलसंधारणासाठी एकवटलेली ग्रामशक्ती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने दिलेले योगदान… या लोकचळवळीतील अनुभवांना आता शब्दांतून आणि दृकश्राव्य माध्यमांतून अभिव्यक्ती देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘जलनीती’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जलसंधारणाच्या कामात सहभागी झालेल्या नागरिकांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनुभवकथन, कथा, गद्य-पद्य लेखन, कविता, चारोळी यांसह छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

जिल्ह्यात पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने वनराई बंधारे, गॅबियन बंधारे, जलतारा, शोषखड्डे आदी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here