बुरंबावडे येथे पश्चिम विभागामार्फत जलसंवर्धक बंधाऱ्याचे बांधकाम

0
77

तळेरे (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे जलसंवर्धनासाठी बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळाच्या (नोंदणीकृत) वतीने तळे येथील चींचेजवळील ओहळावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

पन्नास वर्षापूर्वी बुरंबावडे गावात पाणीटंचाईची अत्यंत बिकट समस्या होती. पश्चिम विभागातील ग्रामस्थ यांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी श्रमदानाने दोन विहिरी खोदून बांधल्या, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची दारुण चणचण भासत असे. सुमारे चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असे. बुरंबावडे पश्चिम विभाग विकास मंडळाने (नोंदणीकृत) सातत्याने शिकस्तीचे प्रयत्न करीत आतापर्यंत पाण्याची उपलब्धता साधली मात्र यावर्षी पाण्याच्या दुर्लभाचे सावट हे या ग्रामस्थांवर असणार आहे याची सूचक जाणीव राखून पश्चिम विभाग विकास मंडळाने जलसंवर्धक वनराई बंधारा बांधून पाणी अडवून जिरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या बंधाऱ्यामुळे गुरे-ढोरे यांना पिण्यासाठी दीर्घकाळ पाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर नजीकच असणाऱ्या विहीर आणि तळे यांचे पाझरही जिवंत राहुन बहुतांशी पाणी संवर्धित होऊन टिकेल याची ग्रामस्थांना खात्री आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here