तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षाव

0
100

तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड

सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षा

तळेरे

कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीत शिकणाऱा विद्यार्थी आणि तळेरे गावातील रहिवासी असलेला कुमार सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्रच अभिनंदन केले जात आहे.

नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या निवड चाचणीत सार्थक वायंगणकर याने चांगली चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांची चौदा वर्षांखालील मुलांच्या सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. तो उत्कृष्ट फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून कामगिरी बजावत आहे. गेल्या चार वर्षांपासून तो ओझरम येथील शिवमुद्रा ॲकडमीचे प्रशिक्षक मयुर गोरुले आणि वैभववाडी येथील अनय स्पोर्ट्स ॲकडमीचे प्रशिक्षक सुमेध कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेदर बाॅल क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. त्याचबरोबर शालेय गटातील कॅरम आणि स्वॅश खेळात देखील चमकदार कामगिरी बजावली आहे. सार्थक हा तळेरे येथील क्रिकेटपट्टू आणि राजवैभव चायनीज सेंटरचे संचालक राजकुमार वायंगणकर यांचा चिरंजीव आहे.

 

   कु. सार्थक याच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बिसूरे, विद्यालयाच्या संस्थेचे पदाधिकारी तसेच तळेरे येथील श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कु. सार्थक याच्या निवडीबद्दल तळेरे गावचे माजी सरपंच आणि श्री गांगेश्वर क्रीडा मंडळाचे जुन्या फळीतील खेळाडू व पदाधिकारी शशांक तळेकर यांच्या हस्ते सार्थक यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, निलेश सोरप, राजकुमार वायंगणकर, संजय खानविलकर, प्रकाश वायंगणकर, शरद वायंगणकर, पोलीस दलातील गणेश भोवड, अभिमन्यू पाताडे तसेच वायंगणकर कुटुंबातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.

फोटो :-

१) सार्थक वायंगणकर याचे अभिनंदन करताना शशांक तळेकर, संजय पाताडे, राजकुमार वायंगणकर, गणेश भोवड, शरद वायंगणकर, निलेश सोरप, प्रकाश वायंगणकर व इतर

२) सार्थक वायंगणकर

तळेरे येथील कु. सार्थक राजकुमार वायंगणकर याची चौदा वर्षांखालील सिंधुदुर्ग जिल्हा लेदर बाॅल क्रिकेट संघात निवड सार्थक हा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा आठवीतील विद्यार्थी: अभिनंदनाचा वर्षाव

🌸✨ *शरयू क्लासिक – मेजवानी हॉल* ✨🌸

 

💐 आपल्या आनंदाच्या क्षणांना आधुनिक सुविधांची आणि आपुलकीच्या सेवांची सुंदर साथ! 💐

 

🏛️ *बँक्वेट हॉल म्हणजे नेमके काय?*

 

सर्वसाधारण मंगल कार्यालयाच्या तुलनेत अधिक आरामदायी बैठक व्यवस्था, आधुनिक सुविधा, स्वच्छता, रुचकर मेजवानी आणि उत्कृष्ट सेवांचा अनुभव देणारे ठिकाण म्हणजे आधुनिक बँक्वेट हॉल!

 

🎉 *शरयू क्लासिकमध्ये एकाच छताखाली मिळवा…*

 

❄️ मध्यवर्ती वातानुकूलित (Central AC) हॉल

🪑 पाहुण्यांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था

👥 ५०० पाहुण्यांच्या क्षमतेचा प्रशस्त AC हॉल

🍽️ रुचकर मेजवानीसाठी स्वतंत्र केटरिंग सुविधा

🛏️ आवश्यकतेनुसार एकूण १० AC / Non-AC रूम्स

🚻 स्वच्छ व सुस्थितीत स्वच्छतागृहांची सुविधा

🚗 प्रशस्त आणि मुबलक पार्किंग व्यवस्था

🎶 सुमधुर संगीत व कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा

✨ आकर्षक स्टेज सजावट आणि आदरातिथ्यपूर्ण सेवा

⚡ जनरेटर बॅकअपची सुविधा

 

💍 *लग्नसोहळा | साखरपुडा | वाढदिवस | कौटुंबिक समारंभ | इतर मंगलकार्य*

 

🌟 मुंबई-पुण्यातील आधुनिक बँक्वेट हॉलच्या धर्तीवरील सुविधा, आता आपल्या सिंधुदुर्गात!

 

आधुनिक सुविधा म्हणजे अवाजवी खर्च असे नाही! आपल्या बजेटचा विचार करून, योग्य दरात दर्जेदार सुविधा आणि उत्तम सेवा मिळवण्याची संधी म्हणजे शरयू क्लासिक!

 

❤️ आपल्या कुटुंबातील प्रत्येक आनंदाचा क्षण अधिक सुंदर, आरामदायी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आम्हाला एकदा सेवा करण्याची संधी अवश्य द्या.

 

🌺 *आपला आनंद… आमच्यासाठी सन्मान!* 🌺

 

━━━━━━━━━━━━━━━━

 

📍*पत्ता: शरयू क्लासिक, बेलणे खुर्द, नांदगाव नजीक, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.*

 

🛣️ मुंबई–गोवा महामार्ग (NH 66) लगत

 

📞 *बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क:*

 

संजय कदम – 9860347067

दर्पण कदम – 8308129990

 

━━━━━━━━━━━━━━━━

 

🌸 *शरयू क्लासिक – आधुनिक सुविधांचा अनुभव, आपुलकीची सेवा आणि परवडणाऱ्या बजेटमध्ये आनंदाचा अविस्मरण*�

============================

 

✍️ *बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-*

🌟 *संजय अनंत खानविलकर, तळेरे*

*📲 मोबाईल नं. ९४२३८१८४७४/ ८२०८५६४१३०*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here