तळेरे येथे २७ ऑक्टोबरला मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
महिला व्यापारी संघटना व ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचा संयुक्त उपक्रम
तळेरे, दि.२५
महिला व्यापारी संघटना, तळेरे आणि ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी तळेरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दुपारी २ ते ५ या वेळेत तळेरे बाजारपेठेतील कल्याणकर कॉम्प्लेक्स, आर. मार्टच्या वरती आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी, दृष्टी क्षमतेची तपासणी तसेच मोतीबिंदूची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार चष्म्यांचे वाटप योग्य दरात करण्यात येणार आहे. नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करणे आणि आवश्यक नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
तळेरे व परिसरातील नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व्यापारी संघटना, तळेरे आणि ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.



