दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे रंगला पारंपारिक तुळशी लग्न सोहळा

0
58

दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे रंगला पारंपारिक तुळशी लग्न सोहळा

तळेरे दि. २२ नोव्हेंबर 

दिविजा वृद्धाश्रमात दिवाळी नंतर कार्तिकी एकादशीला तुळशी विवाहाचा कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात साजरा केला जातो. आश्रमातील आजी आजोबा वाढते वय आणि शाररिक व्याधी मुळे बाहेरच्या लग्न सोहळ्याला जाऊ शकत नाही पण त्यांनाही लग्नाचा आनंद मिळावा म्हणून दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.
या सोहळ्यात आश्रमातील आजोबा श्री. कृष्णा परब, वय -70 या आजोबांचे पारंपारिक पद्धतीने लग्न लावण्यात आले.
केळवण,मांडव, पत्रिका,चुडा भरणे, तांदूळ निवडणे, घाणा भरणे, मेहंदी,पुण्यवचन, हळद, अक्षता, मुंडावळ्या, मंगलाष्टका,वरात अशा संपूर्ण पारंपारिक विधिंनी पार पाडला. लग्न विधी सुरु असताना आजोबांना अश्रू अणावर झाले. आजोबा अविवाहित असल्याने आपल्या आयुष्यात लग्नाचा आनंद मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन दिविजा वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. संदेश शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुण्यवचनाचा विधी आश्रममधील आजोबा गणपत घाडी व त्यांच्या पत्नी सरस्वती घाडी यांनी केला.या सोहळ्यातील विविध जबाबदाऱ्या आश्रमातील कर्मचाऱ्यांनी पार पाडल्या.
सौं. अमृता इंदप हिने पुढाकार घेऊन पारंपरिक पद्धतीने चुडा भरला. पत्रिका नियोजन कु. अश्विनी पटकारे हिने केले. तसेच मेहंदीची आखणी कु. सायली तांबे व कु. ऋतुजा इंदप यांनी केली. तांदूळ निवडणे कार्यक्रम सौं.अस्मि राणे यांनी पार पाडला. या सोहळ्याची मांडव जबाबदारी श्री. सखाराम कोकरे, श्री. सुहास चव्हाण, यांनी पार पाडली. घाणा भरणे सौं. प्रतीक्षा सावंत, सौं सानिया इंदप यांनी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर हळद कार्यक्रम नियोजन श्री.समीर मिठबावकर व श्री. अक्षय परब यांनी पार पाडली.लग्नासाठी आजोबांना सदरा लेंगा पेहराव तयारी श्री. महादेव हुंबे यांनी केली. आजींना साड्या नेसवून नटवणे याची जबाबदारी श्रीम. प्रमिला शेलार,सौं. सारिका सावंत, सौं. सायली इंदप, सौं. केतकी पेडणेकर यांनी जबाबदारी पार पाडली.
लग्न सोहळ्यात आश्रमातील कर्मचारी श्रीम. भारती गुरव यांनी आपल्या सुस्वर आवाजात मंगलाष्टके गाऊन वातावरण मंगलमय केले. तसेच सोहळ्यातील पंचपक्वान जेवणाची जबाबदारी सौं. मंजिरी राणे व सौं. अनुजा आचरेकर यांनी पार पाडली या वेळी संस्थेचे सदस्य श्री किरण नारायणकर व सहकुटुंब तसेच संस्था सदस्या श्रीम. उज्वला लोके उपस्थित होत्या. तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.या सोहळ्यामुळे आश्रमात लग्नासारखे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते अनेक आजी आजोबांच्या डोळ्यात जुन्या आठवणी तरळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here