२३ व्या सबज्युनिअर राज्य वुशू स्पर्धेचे ३० रोजी कोराडी नागपूर येथे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

0
2

२३ व्या सबज्युनिअर राज्य वुशू स्पर्धेचे ३० रोजी कोराडी नागपूर येथे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

तळेरे, दि. २५ नोव्हेंबर 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने २३ वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय वूशु (मुले व मुली) निवड चाचणी स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, कोराडी, नागपूर येथे पार पडणार आहे.

या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी होऊन आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मार्क धरमाई यांनी केले आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित वूशु खेळाडूंना राज्यस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वूशु खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here