सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

0
5

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग, दि. २७ नोव्हेंबर 

अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत पीडित व्यक्तींना देय असलेल्या नुकसान भरपाई व अर्थसहाय्य तात्काळ वितरित करण्यात यावे तसेच संबंधित प्रस्तावांवर शासनाच्या प्रचलित नियम व तरतुदींनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस पोलीस निरिक्षक प्रविण कोल्हे, सहा. संचालक, सरकारी अभियोक्ता यांचे प्रतिनिधी वर्षा प्रभु, पोलीस निरिक्षक (नाहसं) ज्योती चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग यांचे प्रतिनिधी समिधा ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी, सचिन अडसूळ, समितीचे प्रभारी सदस्य सचिव विशेष अधिकारी तुषार गवळी, इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

यावेळी जिल्हयातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदयांतर्गत आजतायगत दाखल प्रकरणांची सदयस्थितीचा आढावा घेतला. तसेच पोलीस विभागाला दोषारोपपत्र विहित वेळेत सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

समितीचे सदस्य सचिव यांनी पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त व पीडीत व्यक्तींना द्यावयाचे अर्थसहाय्य याबाबतचा आढावा समितीसमोर दिला. तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खुन प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना शासकीय नोकरी अथवा निवृत्तीवेतनाचा लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here