प्रथमेश तांबे याने‌ एमपीएससी परीक्षेत मिळविलेले दैदिप्यमान यश शिरवल गावांसाठी अभिमानास्पद – कृष्णा कुडतरकर शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणा, आणि सामान्य माणसांप्रती सेवेची भावना जपणे अत्यंत महत्त्वाचे!

0
248

प्रथमेश तांबे याने‌ एमपीएससी परीक्षेत मिळविलेले दैदिप्यमान यश शिरवल गावांसाठी अभिमानास्पद – कृष्णा कुडतरकर

शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणा, आणि सामान्य माणसांप्रती सेवेची भावना जपणे अत्यंत महत्त्वाचे!

कणकवली, दि. २८ नोव्हेंबर 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत शिरवल गावचे सुपुत्र कु. प्रथमेश प्रकाश तांबे यांनी शिरवल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद आहे.असे प्रतिपादन कृष्णा कुडतरकर यांनी केले.

ते शिरवल विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या प्रथमेश तांबे याचा सत्कार शेखर शिरसाठ मित्र मंडळ , शिरवल ग्रामस्थ आणि विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर, सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, पोलीस पाटील सुशील तांबे, दत्ताराम नानचे, कृष्णा कुडतरकर, आत्माराम शिरसाठ, भाई कोदे, शरद शिरसाठ, प्रमोद नानचे, सुनिल कुडतरकर, तुळशीदास कुडतरकर, प्रथमेश तांबे, प्रकाश तांबे, लवु तांबे, अनिल कुडतरकर, प्रविण कोरगावकर, प्रशांत कुडतरकर, सुनील तांबे, मंदार तांबे, राजू चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना कृष्णा कुडतरकर म्हणाले की,केवळ पद मिळवणे हे अंतिम ध्येय नसून, शासकीय सेवेत काम करताना प्रामाणिकपणा, नम्रता आणि सामान्य माणसांप्रती सेवेची भावना जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” प्रथमेश आपल्या नोकरी मध्ये सेवेची भावना जपत चांगली सेवा देईल.असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सरपंच सौ.गौरी वंजारे म्हणाल्या की,प्रथमेशची मुंबई नगरपाल कार्यालयात ‘बेलिफ’ (Bailiff) या पदावर निवड झाली आहे.या यशामागे त्याचे कष्ट,जिद्द, मेहनत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना प्रथमेश तांबे याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, काका श्री. लवू तांबे यांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादाला दिले.गावातील मंडळींनी केलेला हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.तुम्ही दिलेले प्रेम आणि केलेला हा हृद्य सत्कार मला सकारात्मक उर्जा देईल.ग्रामीण भागातील तरुणांनी जिद्द आणि चिकाटीने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर, उपसरपंच प्रवीण तांबे, प्रविण कोरगावकर, सुनील कुडतरकर, मंदार तांबे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथमेश ला शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, शेखर शिरसाठ मित्र मंडळाचे कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here