
सरस्वती एज्युकेशन सोसायटी दादर, मुंबई यांच्याकडून ओझरम शाळा नं. १ येथे शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप
तळेरे, दि. १३
सौ. प्राची दळवी यांच्या विशेष प्रयत्नाने “सरस्वती एज्यूकेशन सोसायटी दादर, मुंबई” या संस्थेमार्फत ओझरम शाळा नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना ६४ हजार रुपये शैक्षणिक गुणवत्ता शिष्यवृती धनादेशाद्वारे प्रधान करण्यात आली.
सौ. प्राची प्रकाश दळवी या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) दादर, मुंबई या संस्थेच्या सरस्वती इंग्लिश स्कुल, अंधेरी -मुंबई येथून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. तसेच सध्या त्या या संस्थेच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्या ओझरम नं.१ शाळेच्या माजी विद्यार्थीनी आहेत. ओझरम नं. १ शाळेतील इ. ५ वी ते इ. ७ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना “विशेष शैक्षणिक गुणवत्ता” प्रतिविद्यार्थी दोन हजार रुपये धनादेश स्वरूपात देण्यात आली. मागील वर्षीही त्यांनी २२ विद्यार्थ्यांना ४४ हजार शिष्यवृत्ती मिळवून दिली होती. तसेच सरस्वती एज्युकेशन सोसायटी दादर, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कामाची माहिती सांगितली. तसेच बालपणातील शाळेच्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थ्यांनो गुणवंत व्हा, भरपूर ज्ञान मिळवून जीवनात सक्षम व्हा व यशवंत व्हा. असा मोलाचा संदेश मुलांना दिला व शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच यावेळी विनायक राणे, जे. डी. राणे व सौ. समृद्धी सुधाकर राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ. प्राची दळवी यांचा शाळेच्या वतीने गावच्या सरपंच सौ. समृद्धी राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व सरस्वती एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमावेळी गावच्या सरपंच सौ. समृद्धी राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश राणे, पं. स. कणकवलीचे माजी सभापती तथा विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष विनायक राणे, निवासी संकुल दक्षता समिती अध्यक्ष एल. डी. राणे, सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी जे. डी. राणे, माजी शिक्षण वि. अधि. सुहास पाताडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बंडू राणे, शाळेचे मुख्याध्यापक विनायक जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. संगिता पाटील, अरविंद राणे, भाई दळवी, राजेंद्र राणे, विनोद राणे, संतोष राणे, दिपक राणे, संग्राम पाटील, श्रीम. रेखा पवार, श्रीम. वैष्णवी गायकवाड, सौ. सुप्रिया मेस्त्री, सौ. शाल्मिनी राणे, सौ. वनिता राणे, सौ. सान्वी खरात, सौ. अपर्णा राणे, सौ. दिव्या राणे, सौ. दुर्वा राणे, सौ.ज्योती बिर्जे, सौ. प्रेरणा सावंत, सौ. पटकारे, सौ. गुरव, विनायक मार्गे व पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक जाधव यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार श्रीम. शालिनी तांबे यांनी मानले.



