सावंतवाडीत १६ ऑक्टोबर रोजी अभाविपतर्फे ‘सिंधुशक्ती’ युवती संमेलनाचे आयोजन!

0
3

 

सावंतवाडी:

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सावंतवाडी येथे ‘सिंधुशक्ती’ युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “सिंधुची अथांगता, दुर्गेची अडहळता आणि युवतींची ऊर्जा!” हे या संमेलनाचे प्रेरणादायी घोषवाक्य असणार आहे.

संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये:

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२६

वेळ: सकाळी ९:३० वाजता

स्थान: बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी

वयोगट: १६ ते २९ वर्षे वयोगटातील युवतींसाठी खुले

युवतींमध्ये आत्मविश्वास वाढवणे, त्यांना राष्ट्रीय विचारांशी जोडणे आणि विविध क्षेत्रांत नेतृत्व करण्यासाठी प्रवृत्त करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने युवती सहभागी होणार आहेत.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवतींसाठी नोंदणी अनिवार्य असून, त्यासाठी पत्रकावर विशेष क्यूआर कोड (QR Code) उपलब्ध करून देण्यात आला आहे. जास्तीत जास्त युवतींनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्हतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here