विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा अति वापर टाळावा व व्यसनांपासून दूर रहावे : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर

0
0

तोंडवली येथील बी. फार्मसी कॉलेजच्या दिक्षांत पदवीदान समारंभात प्रतिपादन

तळेरे, दि. १९

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) बदलत्या युगात विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून समाजासाठी योगदान द्यावे. आपण सोशल मिडीयाचा वापर आपले ज्ञान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आवश्य करावा. यातून आपलाच विकास होईल मात्र सोशल मिडीयाचा अति वापर टाळून आपले जीवन चांगले जगायचे असेल तर व्यसनमुक्त आणि निरोगी रहा असे आवाहन सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले. ते सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली येथे बी. फार्मसी (२०२१–२०२५) बॅचच्या दिक्षांत पदवीप्रदान समारंभात बोलत होते.

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करुन करण्यात आली. यावेळी गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, पणजीचे प्राध्या. डॉ. मैथिली जीडीगुंटा, संचालक जयेश सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, फार्मसीचे प्राचार्य डाॅ. मनोज कदम, कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पेडणेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शकुंतला नागराज, इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य सुरजकुमार सातवेकर यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मैथिली जीडीगुंटा यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात एक सक्षम व जबाबदार फार्मासिस्ट म्हणून कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानतंर प्राचार्य डॉ. मनोज कदम यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्रज्ञाची शपथ दिली. दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या उपस्थित बी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सिल्वी गोन्सालवीस व आभार प्रा. संपदा दुखंडे यानी मानले.

फोटो : तोंडवली येथे दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवर व विद्यार्थी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here