सेवासंकल्प अभियानांतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे निकाल जाहीर

0
6

सेवासंकल्प अभियानांतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे निकाल जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पाच गटांतील विद्यार्थ्यांनी पटकावली प्रथम तीन क्रमांकांची पारितोषिके

 सिंधुदुर्ग, दि. २०

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद विभागामार्फत आयोजित सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी पाच गटांतील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहेत. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

 

चित्रकला स्पर्धेतील विजेते

चित्रकला स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये देवश्री सचिन तवटे (जि.प. पूर्व प्राथमिक शाळा, चिंदर नं. १, मालवण) हिने प्रथम, मैत्री निवृत्ती गवस (जि.प. प्राथमिक शाळा, डोंगरपाल, सावंतवाडी) हिने द्वितीय, तर मेघा मकरंद देसाई (जि.प. प्राथमिक शाळा, सावंतवाडी नं. २) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

गट क्रमांक २ मध्ये आराध्या अभय कोठावळे (जि.प. प्राथमिक शाळा, इन्सुली नं. ८, सावंतवाडी) हिने प्रथम, सिया संतोष मोहिते (बालभवन विद्यामंदिर, मौदे, वैभववाडी) हिने द्वितीय, तर विघ्नेश अंकुश गुरव (जि.प. शाळा, वाघेरी नं. १, कणकवली) याने तृतीय क्रमांक पटकाविला.

गट क्रमांक ३ मध्ये सर्वेश दिनेश मेस्त्री (न्यू शिवाजी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल, जांभवडे, कुडाळ) याने प्रथम, श्रावणी संतोष पांचाळ (विद्यामंदिर, आखवणे नं. १, वैभववाडी) हिने द्वितीय, तर भूमी योगेश आईर (भगवती हायस्कूल, मुणगे, देवगड) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

गट क्रमांक ४ मध्ये दुर्वांक्षी दीपक फाटक (अ. रा. विद्यालय, वैभववाडी) हिने प्रथम, निष्का संदीप नार्वेकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) हिने द्वितीय, तर खुशी संतोष चौकेकर (शिरगाव हायस्कूल, देवगड) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

गट क्रमांक ५ मध्ये नेहाली विठोबा खवणेकर (स. का. पाटील हायस्कूल, मालवण) हिने प्रथम, रुचिता चंद्रशेखर वराडकर (वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा, मालवण) हिने द्वितीय, तर मनाली अरुण घाडीगावकर (कळसुली इंग्लिश स्कूल, कणकवली) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

वक्तृत्व स्पर्धेतील विजेते

वक्तृत्व स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये हंसिका बावदाणे (जि.प. शाळा, भडगाव मलाड, कुडाळ) हिने प्रथम, श्रेजा अंकुश कणेरकर (जि.प. शाळा, कोळंब कातवड, मालवण) हिने द्वितीय, तर संस्कृती सिद्धेश साटम (विद्यामंदिर, वाभवे नं. १, वैभववाडी) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

गट क्रमांक २ मध्ये स्वामिनी संजय पाटील (विद्यामंदिर, कोकीसरे नारकरवाडी, वैभववाडी) हिने प्रथम, दक्ष वालावलकर (जि.प. प्राथमिक शाळा, सावंतवाडी नं. २) याने द्वितीय, तर स्पृहा सुमित दळवी (जि.प. शाळा, दोडामार्ग नं. १) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here