
तळेरे २३:
मुंबई विद्यापीठाअंतर्गत आयोजित कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेत विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सिद्धार्थ जठार या विद्यार्थ्याने अप्रतिम कामगिरी करत महाविद्यालयासाठी इतिहास रचला आहे. सिद्धार्थने भालाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
सिद्धार्थ हा दळवी महाविद्यालयात तृतीय वर्ष BAF विभागात शिक्षण घेत आहे. या स्पर्धेसाठी त्याला महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. विशाल भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सिद्धार्थच्या या ऐतिहासिक यशाबद्दल महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री. विनायक दळवी , समन्वयक श्री. श्रीपाद वेलिंग, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. हेमंत महाडिक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




