मंजूर विमा रकमेचा धनादेश उत्कर्षच्या आई-वडिलांकडे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते सुपूर्त

0
11

मंजूर विमा रकमेचा धनादेश उत्कर्षच्या आई-वडिलांकडे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते सुपूर्त

कणकवली, दि. २५

  1.  कणकवली कॉलेज कणकवली येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कुमार उत्कर्ष मनोहर जाधव याचे दिनांक २४/०४/२०२५ रोजी अपघाती दुःखद निधन झाले होते.

कणकवली कॉलेज, कणकवली येथे शिक्षण घेत असल्यामुळे महाविद्यालयाने ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनीकडे विमा संरक्षण पॉलिसी घेतली होती. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे.

मंजूर विमा रकमेचा धनादेश उत्कर्षच्या आई-वडिलांकडे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री युवराज महालिंगे, अधीक्षक श्री संजय ठाकूर, श्री संजय राणे, श्री भूषण राणे व विद्यार्थ्यांचे वडील श्री मनोहर जाधव व आई मोहिनी जाधव इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here