
सावंतवाडी दि.१३
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत पदकांची लयलूट केली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
क्वॉड स्केटिंग (Quad Skating) या क्रीडा प्रकारात
११ वर्षांखालील मुलांच्या गटात कनिष्क कदम (इयत्ता ३ री ‘क’) याने प्रथम तर फ्रँकलिन फर्नांडिस (इयत्ता ३ री ‘क’) याने द्वितीय क्रमांक पटकावला.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात अलेसिया झेवियर (इयत्ता ४ थी ‘क’) हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात रावी आईर(इयत्ता ७ वी ‘क’) हिने प्रथम, जॉईस मेंडिस (इयत्ता ७ वी ‘क’) हिने द्वितीय, तर भावी सावंत (इयत्ता ७ वी ‘ड’) हिने तृतीय क्रमांक पटकावला.
इनलाईन स्केटिंग (Inline Skating) या क्रीडा प्रकारात
११ वर्षांखालील गटात कुमार ओम मिशाळ (इयत्ता ४ थी ‘ड’) याने द्वितीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षांखालील गटात कुमार देवांशीष सावंत (इयत्ता ७ वी ‘क’) याने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षांखालील मुली: विधी मिशाळ (इयत्ता ७ वी ‘ड’) हिने प्रथम, तर हंसिका शिंदे (इयत्ता ७ वी ‘क’) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी सर्व विजयी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे.
या शानदार कामगिरीबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांवर शिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींमधून अभिनंदन करण्यात येत आहे.



