डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त तळेरेत  ‘वाचन प्रेरणा दिन’

0
26

स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयात नव्या पुस्तकांचे प्रदर्शन; वाचकांना पुस्तकांची ओळख करून देणार

तळेरे : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या पुस्तकांशी वाचकांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त वाचनालयात नव्याने खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे येथे हा उपक्रम होणार आहे. प्रदर्शनात वाचनालयाने नव्याने खरेदी केलेल्या पुस्तकांचा समावेश असून, वाचकांना या पुस्तकांची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे.

डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून वाचनाची आवड वाढविणे, नव्या पुस्तकांकडे वाचकांना आकर्षित करणे आणि ज्ञानवृद्धीसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य, वाचक, सभासद, हितचिंतक आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here