
तळेरे : 17
सरस्वती पूजनानिमित्त तळेरे – औदुंबर नगर येथील जिल्हा परिषद शाळेत सरपंच हनुमंत तळेकर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी माजी सरपंच शशांक तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश सुतार, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, मुख्याध्यापिका अश्विनी यमगर, शिक्षक, पालक, विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.



