
तळेरे, दि. १९
भारतीय संस्कृतीत मातीच्या पणतीला आणि नवरात्रीतील अखंड ज्योतीला विशेष महत्त्व आहे. मातीची पणती आपल्या परंपरेचं प्रतीक आहे, तर अखंड ज्योत ही निरंतर श्रद्धा, भक्ती आणि मांगल्याची भावना व्यक्त करते.
याच पणतीवर नवदुर्गांची नऊ रूपं साकारताना मी माती, रंग आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नऊ पणत्या म्हणजे नवदुर्गांची नऊ दिव्य स्वरूपं आणि त्या प्रत्येक स्वरूपातून व्यक्त होणारी आदिशक्तीची महती.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत आदिशक्तीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. याच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतून प्रेरणा घेत मी नऊ मातीच्या पणत्यांवर नवदुर्गांची नऊ रूपं साकारली आहेत.
या कलासंकल्पनेत नऊ पणत्या म्हणजे नवदुर्गांच्या नऊ रूपांचं दर्शन, त्यांवरील चित्रं म्हणजे माझ्या कलेतून व्यक्त झालेली देवीभक्ती आणि अखंड ज्योत म्हणजे निरंतर श्रद्धेचा प्रकाश, असा प्रतीकात्मक अर्थ मी मांडू इच्छिते
भारतीय संस्कृतीत मातीच्या पणतीला विशेष महत्त्व आहे. पणतीचा प्रकाश हा अंधःकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि निराशेतून आशेकडे जाण्याची प्रेरणा देतो.
या कलाकृतीच्या माध्यमातून मातीशी जोडलेली आपली सांस्कृतिक परंपरा, नवरात्रीतील देवीभक्ती आणि चित्रकलेतील सर्जनशीलता यांचा संगम साधण्याचा माझा प्रयत्न आहे.
हे चित्र ऍक्रेलिक कलर च्या माध्यमधून साकारलेले असून
चित्राची उंची प्रत्येकी – 1.5 ते 2 cmअशी आहे .
या माझ्या चित्राच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
या पुर्वी रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण , मोर पिसावर श्रीकृष्ण अशी ,सूक्ष्म टिकली वर नऊ दुर्गांची चित्रे तसेच सूक्ष्म टिकली वर आशा ताई भोसले आणि विनेवरती विठ्ठल रूक्मिणी यांची कलाकृती ,बासरी वर श्री कृष्ण अशीअनेक चित्र साकारली आहेत या चित्रातून सामाजिक टच दिसुन येतो.
गाव.गडमठ
ता. वैभववाडी
जि. सिंधुदुर्ग
चित्रकार श्रुती संतोष सुतार
8928968093



