सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन! जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी ९ ठिकाणी सुविधा नवीन परवान्यांसाठीही अर्ज स्वीकारणार

0
14

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन!

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी ९ ठिकाणी सुविधा नवीन परवान्यांसाठीही अर्ज स्वीकारणा

तळेरे, दि. २३ नोव्हेंबर

सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि अन्न व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना अन्न सुरक्षा परवान्याचे नूतनीकरण तसेच नवीन परवाना काढण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या व्यापाऱ्यांच्या अन्न सुरक्षा परवान्याची मुदत जानेवारी व फेब्रुवारी २०२७ पर्यंत संपत आहे, अशा सर्व व्यापाऱ्यांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

 # शिबिरांचे ठिकाण व तारखा पुढीलप्रमाणे :-

गुरुवार, २६ नोव्हेंबर – कुडाळ व्यापार भवन, शनिवार, २८ नोव्हेंबर – कट्टा पंचक्रोशी, विठ्ठल मंदिरासमोर, रविवार, २९ नोव्हेंबर – देवगड व्यापार भवन,मंगळवार, १ डिसेंबर – दोडामार्ग, पिंपळेश्वर हॉल,बुधवार, २ डिसेंबर – चौके, नितीन गावडे, गुरुवार, ३ डिसेंबर – वैभववाडी व्यापार भवन, शनिवार, ५ डिसेंबर – कणकवली, दीपक बेलवलकर यांचे कार्यालय, रविवार, ६ डिसेंबर – तळेरे-कासार्डे-नांदगाव परिसरासाठी तळेरे येथील नक्षत्र निवास व न्याहारी (राजू जठार) येथे तसेच सायंकाळी नांदगाव येथे शिबिर होणार आहे, मंगळवार, ८ डिसेंबर – मालवण, प्रमोद ओरसकर यांच्या आस्थापनेसामोर.

,अन्न सुरक्षा परवान्याच्या नूतनीकरणासाठी परवान्याची मूळ प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि एक फोटो आवश्यक आहे.

नवीन परवान्यासाठी वरील कागदपत्रांसह ग्रामपंचायत अथवा नगरपंचायतीचा ना-हरकत दाखला, घरपट्टी उतारा तसेच जागा भाड्याची असल्यास भाडेकरार किंवा जागामालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे.

या शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित तालुक्यांचे अध्यक्ष आणि जिल्हा प्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शिबिरस्थळी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी अरविंद नेवाळकर (मो. ९८९०२९१६०७) यांच्याशी संपर्क साधावा.

सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित व्यापारी व व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here