ओरोस येथे २५ नोव्हेंबर रोजी गिरणी कामगारांची सभा  संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागातर्फे आयोजन 

0
3

ओरोस येथे २५ नोव्हेंबर रोजी गिरणी कामगारांची सभा 

संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागातर्फे आयोजन

कणकवली, दि. २३ नोव्हेंबर 

गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार ९ डिसेंबरला नागपूरात गिरणी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी बुधवार २५ नोव्हेंबर रोजी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गिरणी कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे सिंधुदुर्ग चळवळीचे कार्याध्यक्ष रमाकांत बने हे मार्गदर्शन लाभणार आहेत, अशी माहिती संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या गिरणी कामगार विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मंगेश नेवगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबईच्या गिरण्यांमध्ये आयुष्य वेचलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाकडे १ लाख ७४ हजार १०२ गिरणी कामगार व वारसदारांनी सदनिकांसाठी अर्ज केले असताना, शासनाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ १५ हजार ८०० सदनिकांचे वाटप झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामगारांच्या मुबईतील हक्काच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुबईत हक्काचे घर मिळावे, सदनिकेसाठी अर्ज करू न शकलेल्या कामगारांना पुन्हा संधी मिळावी, १९८१ च्या संपातील कामगारांचा पुनर्वसन योजनेत समावेश करावा, संक्रमण शिबिरातील रिक्त घरे तातडीने वितरित करावीत, खोट्या संमतीपत्रांची छाननी करून ती रद्द करावीत, तसेच बॉम्बे डाईंग व न्यू पेट मिलच्या घराची सोडत त्वरित काढावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी आरोस येथे सभेचे आयोजन केले आहे. नागपूर येथील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार व त्याच्या वारसदारांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन संयुक्त मराठी मुंबई चळवळी गिरणी कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here