श्री क्षेत्र माणगाव दत्त मंदिर येथे २४ नोव्हेंबर रोजी स्वरगंधार मैफिल स्वरगंधार संगीत मैफिलीचे आयोजन!

0
7

श्री क्षेत्र माणगाव दत्त मंदिर येथे २४ नोव्हेंबर रोजी स्वरगंधार मैफिल स्वरगंधार संगीत मैफिलीचे आयोजन

कुडाळ, दि. २३ नोव्हेंबर

कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे दुपारी ३:३० वाजता स्वर गंधार संगीत मैफिल चे आयोजन करण्यात आले आहे.

अरे आनंद पोटात माझ्या माईना माईना काही गोष्टी आपण करत असतो त्याचं फलित उशिरा का होईना पण मिळतंच. अक्कलकोट पर्यंत चा संगीतमय प्रवास करायची इच्छा होतीच पण प्रति गाणगापूर, प्रति नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवित्र क्षेत्रात म्हणजे दत्त मंदिर माणगाव येथे स्वरगंधार चा संगीत कार्यक्रम करण्याचा योगायोग आमच्या नशिबात आला.

श्री गुरू दत्तात्रय महाराज, प. पू. टेंबे स्वामी महाराजांची कृपा आणि आई वडिलांची पुण्याई यामुळे खरंतर हा योग जुळून आला आहे‌. खरोखर नशिबवान आहेत हि मुलं (कलाकार) ज्यांना काडीच्या बिडीचं सुद्धा व्यसन नाही… पण व्यसन आहे ते फक्त हरिनाम संकीर्तन. आज हि मुलं कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत या कलेमध्ये कारण कलेसाठी दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही.

आज हि आनंदवारी करताना “संकल्प शिवप्रतिष्ठान”च्या प्रत्येक सदस्याला आनंद होत आहे. या वारीत / संगीत मैफिलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here