तरुणांनी सामाजिक कार्याची सुरुवात रक्तदानाने करावी- दिलीप पाटील -कुर्ली येथे शिवप्रेरणा युवा मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

0
8

तरुणांनी सामाजिक कार्याची सुरुवात रक्तदानाने करावी- दिलीप पाटील

-कुर्ली येथे शिवप्रेरणा युवा मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन 

वैभववाडी, दि. २३ नोव्हेबर

तरुणानी सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहभाग घ्यावा. सामाजिक उपक्रम राबवित असताना तरुण पिढीने सामाजिक कार्याची सुरुवात स्वतः रक्तदान करून करावी असे आवाहन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले.

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई कुर्ली आयोजित नवजीवन ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी देवस्थान उपसमिती कुर्लीचे अध्यक्ष बंडू पाटील, कुर्ली उपसरपंच अंबाजी हुंबे, देवस्थानचे  सदस्य कृष्णा पाटील, नरेश पाटील, शिवगंगा पर्यटन संस्थेचे संस्थापक प्रदीप पाटील, नवतरुण मित्र मंडळ टेंबवाडीचे अध्यक्ष विठोबा पाटील, बुवा अनिल राणे, गणेश पाटील, नरेश भोगले, विनायक पाटील, गणेश राणे, शैलेश राणे, उमेश परब, नवजीव ब्लड सेंटरचे ऋषिकेश कोरडे, डॉ. स्नेहल कामतेकर, नवजीवनच्या संचालिका भाग्यश्री पवार, सुप्रिया पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे पाटील म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे .रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते .म्हणून रक्त दान  करणे ही काळाची गरज आहे.गावातील तरुणानि भविष्यात एकत्र येऊन रक्तदानासारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासावी,शिव पेरणा युवा मित्र मंडळाने गेले अनेक वर्ष आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अनेक उपक्रम गावांमध्ये राबविले आहेत. यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित  केले, धार्मिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी मंडळाने जोपासली आहे. यारक्तदान शिबिराला सुमारे 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर शेवटी आभार मोहन पडवळ यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here