तळेरे:

कमी पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि घटणारी भूजल पातळी लक्षात घेऊन जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पीएम श्री जि. प आदर्श शाळा तळेरे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी तळेरे येथील काजर्याचा ओहोळात कच्चा बंधारा उभारला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर व सहशिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या जलस्रोतांवर बंधारे का घालण्यात येत आहेत, यामागील उद्देश समजावून सांगितला. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे, विहिरींच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे यासाठी बंधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा देवकी तळेकर, उपाध्यक्षा अनुष्का गोसावी, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, सुयोग तळेकर, पालकवर्ग सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व समजावून देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच पाण्याबाबत सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला.
क्लियर कट न्यूज चैनल च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FWXo2RLrqSR6FHuBV7QDRV?s=cl&p=a&mlu=4&ilr=4



