सौ. माया हेमंत भाटकर यांच्या पत्रलेखनाचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

0
2

तळेरे

आपल्या निर्भय व निष्पक्ष लेखणीने गेली सलग २७ वर्षे सौ. माया हेमंत भाटकर यांनी सामाजिक प्रश्न, शैक्षणिक सुधारणा, वित्तीय धोरण, सायबर सुरक्षा, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, कौटुंबिक सुसंवाद, स्त्रियांवरील अत्याचार या आणि तत्सम अनेक सामाजिक विषयांवर ६१३६ वाचकपत्रे लिहून समाज प्रबोधन केले आहे. त्या पत्रांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधील विविध दैनिकांमधून प्रसिध्दीही देण्यात आली आहे. या सामाजिक पत्रलेखनाची दखल राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डस्’ने घेऊन त्यास प्रमाणित करण्यात आले आहे. ‘पत्रलेखन हेच माझे “ईकेगाई” _ जीवनध्येय आहे’, असे सौ. माया भाटकर मानतात. हा वसा अखंडपणे चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

या शिवाय शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं योगदान आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट व मॅनेजमेंट काॅऊन्सिल सदस्या ही महत्वपूर्ण पदे त्यांनी भूषवली आहेत. सध्या त्या ‘जनकल्याण सहकारी बँके’च्या ‘संचालक मंडळा’वर संचालक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातही अनेक विकास प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. विविध संस्थात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी पत्रलेखनाचा ध्यास जोपासला आहे.

या पत्रांद्वारे त्यांनी महिलांचे प्रश्न, त्यांचे हक्क, सामाजिक अनिष्ट प्रथा आणि नागरिक समस्यांवर रोखठोक भाष्य केलेले आहे. त्याची नोंद आज राष्ट्रीय स्तरावरही झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here