शारदा पूजन नियोजनासह शालेय विकासावर चर्चा

कुंभवडे (प्रतिनिधी):
कुंभवडे नं. १ शाळेमध्ये आज, शनिवार दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती तसेच शालेय भौतिक सुविधा व विकसन समितीची संयुक्त सभा उत्साहात पार पडली.
या सभेला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कांचन तांबे, उपाध्यक्ष तथा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्रीराम सावंत, शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रताप दळवी, समिती सदस्य तथा माजी उपसरपंच रॉबर्ट डिसोझा, पोलीस पाटील तथा सदस्य देवेंद्र दळवी, मुख्याध्यापक प्रवीण कुबल व विद्यार्थी प्रतिनिधी विद्याधर तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सभेमध्ये शाळेतील गुणवत्तावाढ, शालेय भौतिक सुविधांचा विकास आणि आगामी शारदा पूजन उत्सवाचे नियोजन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत उपयुक्त सूचना मांडल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे शाब्दिक स्वागत केले, तर सभेचा समारोप करताना त्यांनी सर्वांचे आभार मानले.



