
तळेरे
कणकवली तालुक्यातील कासार्डे दक्षिण गावठण येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोरील निवासस्थानी वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसिद्ध वाळू व्यावसायिक, उद्योजक मधुकर राजाराम पाटील (वय ८० वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कासार्डे पेट्रोल पंपासमोरील आईलक्ष्मी ऑटोमोबाईलचे मालक नारायण पाटील तसेच वाळू व्यावसायिक विजय व संजय पाटील यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.



