फणसगाव महाविद्यालयच्या वतीने वनराई बंधारा उभारल
तळेरे, दि. १३
पाण्याचे महत्त्व केवळ पुस्तकातून शिकण्यापेक्षा ते प्रत्यक्ष कृतीतून समजून घेणे अधिक प्रभावी ठरते. याच उद्देशाने देवगड तालुक्यातील फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगावच्या वतीने वनराई बंधारे उभारण्यात आले.
फणसगाव महाविद्यालय मधील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत जलसंधारणाच्या कामात सहभाग घेतला. यावेळी फणसगाव पंचकोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र विठ्ठल नारकर व संस्थेचे उपाध्यक्ष महेश विश्राम नारकर व संस्थेचे प्रमुख कार्यवाह संदेश तुकाराम नारकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजविण्याचा संदेश वनराई बंधारा उभारणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबांचे महत्त्व आणि जलसंधारणाची गरज प्रत्यक्षं अनुभवातून समजली. भविष्यातील पिढीने पाण्याचा वापर जपून करावा, पावसाचे पाणी वाया जाऊ न देता त्याचे संधारण करावे आणि गावातील जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी,
याबाबत यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्रमदानातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजवण्याचा संदेश फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माननीय उपाध्यक्ष महेश विश्राम नारकर यांनी दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विनायक जमदाडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती जानवी नारकर प्राध्यापक आशिष ठेकणे सर्व सहकारी प्राध्यापक लिपिक कल्पेश नारकर, योगेश येरम शिपाई ऋषिकेश नारकर यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी श्रमदान केले.
या जलसंधारण योजनेच्या उपक्रमासाठी फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र विठ्ठल नारकर संस्थेचे उपाध्यक्ष महेश विश्राम नारकर संस्थेचे प्रमुख कार्यवाह संदेश तुकाराम नारकर संस्थेचे सर्व कार्यकारिणी सभासद महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री नारकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


फणसगाव महाविद्यालयच्या वतीने वनराई बंधारा उभारल
