गणित संबोध परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा १०० टक्के निकाल:कु. सानवी दळवी जिल्ह्यात प्रथम

0
12

तळेरे, दि. २२

महाराष्ट्र राज्य अध्यापक संघ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. इयत्ता पाचवीचे ३६ आणि आठवीचे २७ असे एकूण ६३ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याने विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. विशेष म्हणजे, इयत्ता पाचवीतील कु.सानवी नारायण दळवी हिने १०० पैकी १०० गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
इयत्ता पाचवीतील गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक – सानवी नारायण दळवी (१००/१०० गुण)
द्वितीय क्रमांक – रशिया इमरान चोचे (९८/१०० गुण)
तृतीय क्रमांक – शिवज्ञा राकेश पताडे, भाग्यश्री रणजीत जाधव, एक आयेशा अब्दुल मोमीन खान आणि आराध्य अनिरुद्ध लवेकर (प्रत्येकी ९४/१०० गुण).
इयत्ता आठवीतील गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रमांक – समृद्धी मनोहर मराठे (९६/१०० गुण)
द्वितीय क्रमांक – प्रीती शिवराज क्षीरसागर, अद्वैत हनुमंत गीते आणि मधु सर्वेशकुमार प्रजापती (प्रत्येकी ९४/१०० गुण).
तृतीय क्रमांक – पूर्वा रामचंद्र घाडी, अन्वेष श्रीकृष्ण नारकर, अहिल्या मधुसूदन राणे आणि सिया वैजू पाटील (प्रत्येकी ९२/१०० गुण).
या यशस्वी विद्यार्थ्यांना माजी पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, गणित विभागप्रमुख व्ही. व्ही. मुद्राळे, डी.डी. मिठबावकर, एस. एम. जाधव, एस. एस. पेडणेकर, पी. वाय. सुतार आणि एन. सी. कानकेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. बी. बी. बिसुरे, प्रभारी मुख्याध्यापक ए. पी. घुले, सौ. आर. आर. सरवणकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

फोटो : २२/१०/२०२६

गणित संबोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्रभारी मुख्याध्यापक, जेष्ठ शिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here