भव्य वैश्य उद्योजक मेळाव्याचे २८ नोव्हेंबर रोजी कोकोनट रिट्रीट, हरकुळ बुद्रुक येथे आयोजन
तळेरे , दि. २७ नोव्हेंबर
वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य वैश्य उद्योजक मेळावा शनिवार दि.२८ नोव्हेंबर २०२६ रोजी कोकोनट रिट्रीट, हरकुळ बुद्रुक, ता.कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री तथा आम.दिपक केसरकर, विधानपरिषद आम.प्रमोद जठार, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उद्योजक डाॅ.नितीन पावसकर, वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डाॅ.संतोष कामरेकर, उपाध्यक्ष दिपक मेजारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात व्यवसायातील संधी आणि संवाद,तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, नेटवर्किंग संधी, व्यवसाय विकासासाठी नवीन दिशा व वैश्य ग्लोबल उद्योजक मेळावा होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महेंद्र आर्डेकर, गणेश म्हसकर यानी केले आहे.



