संविधान दिनानिमित्त वामनराव महाडिक विद्यालयाचे विविध उपक्रम रॅली, पथनाट्य, समूहगीत व चित्रकलेतून संविधान मूल्यांचा जागर; प्रा. अन्वी गवाणकर यांचे सरपंचांकडून कौतुक!

0
12

संविधान दिनानिमित्त वामनराव महाडिक विद्यालयाचे विविध उपक्रम

रॅली, पथनाट्य, समूहगीत व चित्रकलेतून संविधान मूल्यांचा जागर; प्रा. अन्वी गवाणकर यांचे सरपंचांकडून कौतुक!

तळेरे, दि. २७ नोव्हेंबर

भारतीय संविधान दिनानिमित्त दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे यांच्या वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालय ते तळेरे बाजारपेठ अशी संविधान रॅली काढून घोषणा दिल्या. बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य व समूहगीत सादर करून संविधानातील न्याय, स्वातंत्र्य,समता व बंधुता या मूल्यांचा संदेश दिला.

या पथनाट्याचे उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन प्रा.अन्वी गवाणकर यांनी केले. त्यांच्या या सर्जनशील योगदानाचे कौतुक करत तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले.

यावेळी माजी सरपंच शशांक तळेकर, सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, दीपक जठार, संजय खानविलकर, ज्येष्ठ शिक्षक सचिन शेटये, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा विद्यालयाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here