तळेरे येथील रक्तदान शिबिरात 48 दात्यांनी केले रक्तदान   स्व. सुनील तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

0
39

तळेरे येथील रक्तदान शिबिरात 48 दात्यांनी केले रक्तदान

  स्व. सुनील तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

तळेरे, दि. २७ नोव्हेंबर 

तळरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तपासणी उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्गनगरी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे आणि उपकेंद्र तळेरे यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर संपन्न झाले. स्व. सुनील तळेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी तळेरे एस. टी. स्टँड समोरील छ. शिवाजी महाराज रंगमंच येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उद्योगपती नामदेव बांदिवडेकर यांच्या हस्ते स्व. सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. शिवम देशमाने, जिल्हा परिषद सदस्य प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सहदेव खाड्ये, माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, महेश नारकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, विश्वस्त श्रीनिवास पळसुले, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, पत्रकार उदय दुधवडकर, डॉ. अभिजीत कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधानाची उद्देशिका भेट :-

यावेळी सरपंच हनुमंत तळेकर यांनी संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचनालय आणि तळेरे विद्यालयाला भेट दिली. दरम्यान वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले.

अनेक वर्षांपासून रक्तदानाची चळवळ -:

गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत सुनील तळेकर ट्रस्टकडून दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिराला दशक्रोषितील रक्तदाते रक्तदान करून या चळवळीत सहभागी होत आहेत. यावर्षी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन आणि रक्तदाब याची मोफत तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, श्रीनिवास पळसुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रक्तदात्यांना कृतज्ञता म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या शिबिरादरम्यान जिल्हा महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर, माजी जिल्हा परिषद बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार, तळेरे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव, आदर्श व्यापारी संघटना तळेरे अध्यक्ष राजू जठार, आदर्श रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेरे नं. 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवकी तळेकर, तळेरे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर या मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

तळेरे येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here